स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त अतिरिक्त तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार ३० ऑगस्ट नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन, ७ सप्टेंबर, गोपाळकाला, १० नोव्हेंबर धनत्रयोदशी हे दिवस स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. असे कोकण विभागीय आयुक्त यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.