स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ८ परिसरात साईभक्त सेवा मंडळ आणि समाजसेवक पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या माध्यमातून योग दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने आयोजित योग कार्यक्रमात स्थानिक भागातील १००हून अधिक रहीवाशी सहभागी झाले होते.
निरोगी शरीरासाठी व शरीर संवर्धनासाठी योगाचे असलेले महत्व समाजाला पटवून देण्यासाठी पांडुरंग आमले यांनी बुधवारी सकाळी सानपाडा सेक्टर ८ परिसरात मोफत योगा शिबिराचे आयोजन केले होते. विभागातील डॉक्टर, समाजसेवक, शिक्षक, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक रहीवाशी या शिबिरात सहभागी झाले होते. पांडुरंग आमले यांनी या शिबिरात सहभागी होवून स्थानिकांचा उत्साह वाढविला.
योग प्रशिक्षक श्री विष्णुदास मुखेकर ,श्री आनंद गावडे व सौ. जया भोर यांचे अनमोल मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले
*भारतीय जनता पार्टी सानपाडा जुईनगर मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप, आयटी सेल संयोजक पंकज दळवी ,समाजसेवक श्री रुपेश मढवी, भारतीय जनता पार्टी तालुका महामंत्री श्री रमेश शेटे ,ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संघाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे, ज्येष्ठ नागरिक संघ पामबीच सानपाडा श्री श्रीपाद पत्की, श्री सुभाष बारवाल, बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सुनीता डोंगरे व संचालक सौ. नीता गावडे या मान्यवरांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले.