मोफत पाठ्यपुस्तकांचे वितण, गुणवंतांचा सत्कार
नवी मुंबई : सानपाड्यातील विवेकानंद शाळेमध्ये गुरूवारी शालेय विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुवार, १५ जून २०२३ शाळेचा पहिला दिवस. याच दिवसाचे औचित्य साधून माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला. त्याबद्दल विवेकानंद शाळेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्याला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सानपाडा विभागातील व भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले सर त्याचप्रमाणे टी. जे. एस. बी. बँकेचे असिस्टंट मॅनेजर वाघमारे उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक निकुंब तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल,सानपाडा.
शालांत परीक्षा वार्षिक निकाल २०२२-२३- १०० टक्के
१ – प्रथम क्रमांक: कुंभवडे रोशनी संभाजी ९२.२०%
२ – द्वितीय क्रमांक ( विभागून)
कांबळे नम्रता विश्वास ९१.४०%
२ : विभूते रिद्धी महेश ९१.४०%
३ : तृतीय क्रमाक – ढोले श्रद्धा अजित ९०.८०%
४) कदम रोशनी आनंदा – ९०.६०
५) पालवे संदेश श्यामराव – ९०.४०