Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये डासांचा वाढता उपद्रव संपुष्ठात आणण्यासाठी धुरफवारणी करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
सध्या नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. एक महिन्यापासून सानपाडा नोडमध्ये सेक्टर, सानपाडा गाव तसेच पामबीच परिसरातील रहीवाशी डासांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहेत. मलेरिया व डेंग्यूचे रूग्णही सानपाडा नोडमध्ये वाढू लागले आहेत. डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी व साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी गटारांमध्ये अळीनाशके तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर तसेच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धूरफवारणी करणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना सानपाडा नोडमधील सर्व सेक्टर, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात आणि सार्वजनिक ठिकाणी सातत्याने धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची लेखी मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.