- बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची पावसाळी अधिवेशनात विशेष मागणीद्वारे मागणी
- देशाच्या कानाकोपऱ्यातील महिला बचत गटांना व विविध हातमाग कलाकार व इतर क्षेत्रातील कलाकारांचा पोटापाण्याचा प्रश्र्न सुटणार
- सिडको मार्फत अर्बन हाटला लागलेले टाळे उघडावे
Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : राज्य शासनाच्या लघू उद्योग विकास विभागाकडे बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडकोच्या माध्यमातून पर्यावरणाला धक्का न लावता उभारण्यात आलेल्या या कलाग्रामचे स्थान नैसर्गिक असून बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील १२ एकरच्या टेकडीवर उभारलेले कलाग्राम (अर्बन हाट) ला लागलेले टाळे अखेर उघडणार आहे त्यामुळे महिला बचत गटांना व असंख्य हस्तकला व हातमाग कलाकारांना हक्काची बाजारपेठ पुन्हा उपलब्ध होणार आहे.
कोरोना काळानंतर सिडकोने बंद ठेवलेले अर्बन हाट पुन्हा कार्यान्वित न करता अर्बन हाटला कायमचे टाळे ठोकले होते. त्यामुळे महिला बचत गट व असंख्य हातमाग व हस्तकला कलाकारांची हक्काची बाजारपेठ हिराऊन घेण्यात आली होती. याच अनुषंगाने आज बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी चालू असलेले पावसाळी अधिवेशनात विशेष मागणीद्वारे मागणी केली आहे.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता याकरिता राज्य शासनाने निर्माण केलेल्या नवी मुंबईत एकही नैसर्गिक आकर्षक स्थळे नाहीत त्यामुळे सिडको व महापालिकेच्या यांच्या संयुक्त माध्यमातून कृत्रिम पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला व सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशोक सिन्हा यांनी या केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाकडून व राज्य शासनच्या लघू उद्योग विकास विभागाकडून तसेच तत्कालीन विधानपरिषद सदस्या मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ सुमारे १२ एकरच्या टेकडीवर सन २००८ रोजी कलाग्राम (अर्बन हाट) उभारून देशातील महिला बचत गटांना व राज्यातील कलाकारांना एक हक्काची बाजारपेठ तयार करून देण्यात आली होती. तसेच सन २०१० रोजी या कलाग्रामचे कायमस्वरूपी लोकार्पण झाल्यानंतर सिडको आयोजित नवी मुंबई फेस्टिवल अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच अँम्फीथिएटरमध्ये जाहीर कार्यक्रम ही झालेले आहेत व हिंदी-मराठी सिनेकलावंतांनी या फेस्टिव्हलमुळे या कलाग्रामला भेटी दिल्या होत्या या कलाग्राममध्ये गणेश उत्सव, श्रावण मेळा, दसरा मेळा, दीप मेळा अशा अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होत होते. तसेच हरियाणा, केरळ अशा विविध राज्यातून स्वतः तयार केलेले उत्पादन विकण्यास घेऊन येत होते. परंतु कोरोना काळात सिडकोने अर्बन हाटला टाळे लावल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे हे लक्षात येताच बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना सदरच्या अर्बन हाट ची संपूर्णता डागडुगी पूर्ण करुन लवकरात लवकर पावसाळ्यात नंतर अर्बन हाट सुरु करुन द्यावे असेही पत्राद्वारे कळविले असून लवकरच विशेषत: महिला बचत गटांना व कलाकारांना तसेच विविध राज्यातील उत्पादकांना सुगीचे दिवस येणार असल्याचे त्यांनी सांगितले.