Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई – नवीन लग्न झाल्यावर अनेक विधी असतात अनेक सण साजरे करायचे असतात. श्रावण महिन्यात तर अनेक विधी पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर कार्यक्रम याच संदर्भात श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवासंस्थे मार्फत आज या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा व बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था ही गेली २८ वर्षे सांस्कृतिक महोत्सव व विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. तसेच श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदा ही १२ ऑगस्ट २०२३ रोजी ठीक सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे खास महिलांकरिता मंगळागौरीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात दिसून येणार आहे यामध्ये मंगळागौरीची पारंपारिक नृत्य, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद आनंद लुटता येणार आहे. तसेच यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच या मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, पारंपारिक गायन व विविध प्रकारच्या कला दाखविणाऱ्या महिलांना प्रथम परितोषिक रु. ५००१/-, द्वितीय पारितोषिक रु. ३००१, तृतीय परितोषिक रु. २००१/- तसेच उत्तेजनार्थ यांना बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे व लकी ड्रॉच्या माध्यमातून नशीबवान महिला विजेत्याला पैठणी / नथ अशा विविध प्रकारची बक्षीस देऊन सन्मानित केली जाणार आहे. तसेच बक्षीस वितरण समारंभ हे त्याच दिवशी होणार आहे.
तसेच संस्थेच्या अध्यक्षा व बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सदर मंगलागौरी कार्यक्रम हा फक्त १५१1 बेलापूर विधानसभा महिलांसाठी मर्यादित असून प्रवेश हे विनामुल्य आहे व नाव नोंदणी तसेच महिला बचत गटांना स्टॉल (विनामूल्य) लावायचे असल्यास त्यांनी श्रीमती. आरती राऊल -९९६७६४८०९१, हेमंत कोळी – ९१६७३०२८२७, आदित्य नेवरेकर – ७३०४३९३३३ यांना संपर्क साधायचा आहे. तसेच नोंदणीची अंतिम तारीख ही १० ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे याची सर्व महिलांनी नोंद घ्यावयाची आहे.