Navimumbailive.com@gmail.com -९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिम्मित प्रभाग क्रमांक-९६/९७ मध्ये विविध कल्याणकारी योजनांचे राबविण्यात आलेले शिबिर उत्साहात पार पडले.
माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, समाजसेवक गणेश भगत यांनी या शिबिराचेआयोजन केले होते. या शिबिरास भगवानराव ढाकणे, संजय पाथरे, राजु तिकोणे, रविंद्र गावंड, बाळू गर्जे, वासुदेव पाटील, दिलीप खांडे, गोरक्षनाथ गांडाळ, सुनील वायकर, विलास शिंदे, अरविंद जगदाळे, शांताराम कुऱ्हाडे, सहादु सुकाळे, सुरेश ठाकुर, सदानंद मोरे, मनोहर कातुर्डे उपस्थित होते.
भारतीय डाक विभागाच्या १० लाख रुपयांचा अपघाती विमा योजनेमध्ये २१० लोकांनी लाभ घेतला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा १२९ लोकांनी लाभ घेतला.
या योजनांच्या आयोजनासाठी अशोक गांडाळ, सागर मोहिते, मयुर पवार, सुभाष यादव, अविनाश तिकोणे, अरूण यादव, सुभाष यादव, विकास तिकोणे, राजेश घाडी, संदेश घाडी, शुभम नवले, विमल गांडाळ, संगीता कारंडे यांनी परिश्रम घेतले.