Navimumbailive.com@gmail.com -९८२००९६५७३ /८३६९९२४६४६
नवी मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमधील महापालिका प्रभागांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून नवी मुंबईत पाऊस पडत आहे. पावसाळा आणि नवी मुंबईत असणारे साथीचे आजार हे वर्षांनुवर्षाचे समीकरण जुळलेले आहे. दोन महिन्यात पडणाऱ्या पाऊसामुळे सानपाडा नोडमध्ये, जुईनगर नोडमध्ये, सानपाडा पामबीच तसेच सानपाडा गावामध्ये, जुईपाडा गावामध्ये ताप, मलेरिया, डेंग्यू आदी साथीचे रुग्ण दिसू लागले आहेत. साथीच्या आजाराचे रूग्ण खासगी दवाखाने तसेच मेडिक्लेम असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याने पालिका दरबारी या रुग्णांची नोंद होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमध्ये, जुईनगर नोडमध्ये, सानपाडा पामबीच तसेच सानपाडा गावामध्ये, जुईपाडा गावामध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आजार होवू नये आणि आजार झाल्यावर काय करावे याबाबत जनजागृती शिबिराचेही आयोजन करणे आवश्यक आहे. याशिवाय त्या त्या विभागातील नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावून साथीच्या आजाराबाबत लोकांशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला
सानपाडा नोडमध्ये, जुईनगर नोडमध्ये, सानपाडा पामबीच तसेच सानपाडा गावामध्ये, जुईपाडा गावामध्ये आरोग्य शिबिरांचे व जनजागृती शिबिर आयोजनाचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.