नवी मुंबई : कॉंग्रेस का हाथ , आम आदमी के साथ ही उक्ती नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना अनुभवयास मिळत आहे. नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील तानाजी मालुसरे क्रिडांगणावर वाढलेल्या जंगली गवतामुळे परिसरातील मुलांना खेळण्यास मैदान नव्हते. कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व सहभागातून तीन दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले व क्रिडांगण स्वच्छ झाले. रविवारी सकाळी ११ नंतर विभागातील मुले क्रिडांगणावर खेळण्यास परतल्यावर विभागातील रहीवाशांनी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत आणि आयोजक असलेले कॉंग्रेसचे सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचे वॉर्ड ८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांचे आभार मानले.
अडीच महिने पडत असलेल्या पावसामुळे नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढले होते. विभागातील मुलांना खेळण्यास मैदानच नसल्याने लहान मुले घरातच मोबाईल खेळण्यास मुले व्यस्त होती. परिसरातील रहीवाशांनी याबाबत दररोज उद्यानात मॉर्निग वॉक साठी येणाऱ्या कॉंग्रेसचे सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचे वॉर्ड ८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांच्याकडे तक्रार करत मैदानाची सफाई करण्याची मागणी केली. विभागातील रहीवाशांची समस्या जाणून घेतल्यावर जीवन गव्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १२ ऑगस्ट, १९ ऑगस्ट व २० ऑगस्ट असे तीन दिवस सफाई अभियान राबवित क्रिडांगणावरील सर्व जंगली गवत काढून टाकले व रविवारी सकाळी ११ वाजता क्रिडांगण स्वच्छ होत असलेले पाहिल्यावर विभागातील मुले क्रिकेट व फुटबॉल खेळण्यासाटी जमा झाली.
सफाई अभियानात स्वत: जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत, जीवन गव्हाणे यांनी स्वत: क्रिडांगणात बराच वेळ मशिन चालवून जंगली गवत हटविले. यावेळी रोहन इंगवले, सनी डोळस, गणेश इंगवले यांनी सफाई अभियानात आपले योगदान दिले. विभागातील समाजसेवक तुकाराम टाव्हरे सर यांनी दोन दिवस स्वत: उपस्थित राहून सफाई अभियानात सफाई झालेल्यांना प्रोत्साहित करत त्यांच्या कार्यांचे अभिनंदन केले. लहान मुलांना क्रिडांगणावर खेळताना पाहून तीन दिवस मैदान स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या जीवन गव्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमाचे सार्थक झाले असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी दिली. स्वाती इंगवले यांनी सफाई अभियानात सहभागी झालेल्यांना चहा, सॅण्डविच व पाणी उपलब्ध करून दिले.