गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मधील रहीवाशांना माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत व समाजसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्डचे सदस्यांना वितरीत करण्यात आले.
भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी विविध जनहितैषी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या अभियानात स्थानिक रहीवाशांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्यत्व देण्यात आले. सदस्यत्व घेतलेल्या २४९ रहीवाशांना कार्डचे माजी नगरसेविका रूपाली किस्मत भगत व समाजसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून वितरण करण्यात आले.
या वेळी समाजसेवक गोरक्षनाथ गांडाळ, महादेव जगताप, बबन शिंदे, प्रदीप कलशेट्टी, मनोहर कार्तुर्ड, विकास तिकोणे, रविंद्रनाथ चव्हाण, दिलीप राऊत, रमाकांत कलंबे, संतोष शिंदे उपस्थित होते.