गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जुन्नर रोडवरील पिंपळगावच्या दोघा वयोवृद्ध शेतकरी भावाच्या जमिनीवर विना भूसंपादन करता थेट २६ गुंठे जागेतील अतिक्रमणावर पोलीसी पाठबळावर डागडूजी करत न्यायालयीन केसबाबत जनतेला व प्रसिद्धीमाध्यमांना केस जिंकल्याची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नारायणगाव-जुन्नर रोडवर पिंपळगाव या ठिकाणी उत्तम विष्णू खांडगे (वय वर्ष ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्ष ७१) या दोन भावांची पाच एकर जमिन गट क्रं ३०८/१ आहे. या शेतातील तब्बल २६ गुंठे जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. गेली काही वर्षे दहशतीच्या बळावर व गावातील एका घटकाच्या मंत्रालयीन ओळखीच्या बळावर या दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवर पोलीसी पाठबळावर अतिक्रमण करून दोन कुटूंब उद्धवस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. एका मंत्र्यांच्या दालनातून मंत्रालयीन घटक ओळखीच्या बळावर दबाव आणत असल्याचे चौकशीत उघडही झालेले असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
या याबाबत हे दोघे वयोवृद्ध भाऊ प्रशासकीय पातळीवर शेताचे भूसंपादन झालेले नसताना आणि सातबाऱ्यावर कोठेही या अतिक्रमणाबाबत नोंद नसताना व एक रूपयाचाही मोबदला आजतागायत मिळालेला नसताना अतिक्रमण विस्तारत चालले आहे व त्यावर झुंडशाहीच्या बळावर पोलिसी पाठबळावर खतपाणी घातले जात आहे. याबाबत न्यायालयात सुनावणीही सुरु आहे. हे दोघे वयोवृद्ध शेतकरी भाऊ यासंदर्भातील कोणतीही न्यायालयीन केस हारलेले नाहीत, असे खोटे सांगून गावातील अन्य ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे काम गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी चालविले असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
न्यायालयात ६ डिसेंबर २०२२, ३ जानेवारी २०२३, १७ जानेवारी २०२३, १७ फेब्रुवारी २०२३, १४ मार्च २०२३, २६ एप्रिल २०२३, ३ मे २०२३, ६ मे २०२३, १ जुलै २०२३, १७ जुलै २०२३, ४ ऑगस्ट २०२३, १८ ऑगस्ट २०२३ अशा याप्रकरणी सुनावण्या झाल्या असून न्यायालयाने आगामी तारीख २५ ऑगस्ट २०२३ दिलेली आहे. भूंपसादन झालेले नसताना वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल २६ गुंठे जागेवर अतिक्रमण झालेले आहे. या शेतकऱ्यांना व्यवस्थित चालता येत नाही. वयोमानानुसार चालताना तोल जातो. दोन्ही शेतकऱ्यांना व त्यांच्या पत्नींना अनेक आजार आहेत. ३० मे २०२३ रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून आले. हे अतिक्रमण याच दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतीत झालेले असून प्रशासनाने या जमिनीचे कधीही भूसंपादन केलेले नाही व या दोन शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता २०१३-१४ मध्येही दडपशाही व झुंडशाहीच्या बळावर अतिक्रमणाची डागडूजी केली व ३० मे २०२३ रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून अतिक्रमण झालेल्या विनाभूसंपादीत जागेवर डागडूजी (डांबरीकरण) केले आहे. दिवाळीनंतर पुन्हा काम करणार असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
भूसंपादन नसताना कागदावर नोंद नसताना तहसीलदार पोलीस संरक्षणाची मागणी करत आहेत. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी भूसंपादन नसलेल्या व कागदोपत्री कोठेही नोंद नसलेल्या आमच्या शेतातील तब्बल २६ गुंठे जागेवर अतिक्रमण करण्यासाठी ग्रामपंचायतीने ४४ हजार रुपये भरून पोलीस संरक्षणात अतिक्रमण करून घेतले आहे. साहेब हा काय प्रकार आहे? शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. जिल्हा परिषद अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आम्ही न्यायालयात केस जिंकलो आहोत, खांडगे कंपनी केस हारली असे धडधडीत पोलिसांसमोर व प्रसिद्धीमाध्यमांसमोर व ग्रामस्थांसमोर असत्य बोलत होते. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिले. स्वत:चे आमच्या शेतातील अतिक्रमणावर फोटोसेशनही केले. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना केस हारल्याचे धडधडीत असत्य वक्तव्य करून न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत चुकीची दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा. दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे भूसंपादन न करता एक पैशाचाही मोबदला न देता अतिक्रमण सातत्याने करण्याचे व अतिक्रमण विस्तारण्याचे धाडस या गावपुढाऱ्यांकडून सुरू आहे. आमच्या गावातील एक घटक मंत्रालयात असल्याने त्या ओळखीच्या बळावर तो ग्रामस्थांना अतिक्रमणाला साथ देत खतपाणी घालत आहे. दोन शेतकरी भाऊ व परिवार संघर्ष करत आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना धडधडीतपणे बेमुलाम असत्य माहिती ग्रामस्थ व प्रसिद्धीमाध्यमांना देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून आम्हाला याप्रकरणी न्याय द्यावा. आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय की चंबळच्या खोऱ्यात? आमच्या शेतात दिवसाढवळ्या न्यायालयीन प्रक्रियेची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मंत्रालयात काम करून त्या ओळखीच्या बळावर आमच्या परिवाराची मुस्कटदाबी करणाऱ्या घटकापासून आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. यासंदर्भात आपल्या कार्यालयात निवेदने सादर करूनही केवळ ती निवेदने फॉरवर्ड करण्याचे काम झाले आहे. आमच्या परिवाराच्या जीवाला या अतिक्रमण करणाऱ्यांपासून धोका आहे. आमचे दोन्ही परिवार कमालीच्या मानसिक दबावाखाली वावरत असून उद्या कोणाचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाल्यास त्यास हेच घटक जबाबदार राहतील, याची आपण नोंद घ्यावी. साहेब, आमच्या परिवाराला न्याय हवाय… जिल्हा परिषद, नारायणगाव पोलिस स्टेशन, तहसीलदार यांनी राजकीय संगणमताने शेतात अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठेी निर्देश द्यावेत आणि भूसंपादन नाही, कागदोपत्री नोंद नसताना तब्बल २६ गुंठे शेतात रस्ता अतिक्रमण करून या दोन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. आपण याप्रकरणी चौकशी करून अतिक्रमण हटवून या दोन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.