गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रलंबित समस्या व असुविधांना वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी रविवारी (दि. २७ ऑगस्ट) इंटक संलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कंत्राटी वाहनचालकांनी कामगार नेते रविंद्र यांच्या नेतृत्वाखाली स्विकारले.
महापालिकेतील या कंत्राटी वाहनचालकांना अवघ्या ११ ते १२ हजार रूपये वेतनावर काम करावे लागत आहे, त्यांना पीएफ व ईएसआयविषयी माहिती नाही, ईएसआय सुविधेचा लाभ भेटत नाही. ठेकेदार ईएसआय भरत असल्याचे सांगतात, तर या कंत्राटी वाहनचालकांना सुविधेचा लाभ का भेटत नाही. अनेक कामगारांना त्यांच्या पीएफचा क्रमांक माहिती नाही. कमी वेतनात या कामगारांचे शोषण करण्यात येत आहे. ठेक्यात बदल करून वाहनचालकांचे वेतन वाढले पाहिजे, यासह अन्य समस्यांनी पिडीत असलेल्या पालिका सेवेतील या कंत्राटी आस्थापनेतील वाहनचालकांनी नेरूळ सेक्टर दोन येथील महाराष्ट्र कर्मचारी युनियनमधील कार्यालयात जावून संघटनेचे सदस्यत्व स्विकारले.
यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कामगारांचा संघटनेचे सदस्यत्व देताना कामगारांशी चर्चा करून लवकरात लवकर प्रशासनाकडे पाठपुरावा करून समस्यांचे निवारण करून घेण्याचे आश्वासन या कामगारांना दिले. यावेळी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे वाहनचालक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, कंत्राटी कामगार विभाग अध्यक्ष संजय सुतार, संघटनेचे वाशी हॉस्पिटल उपाध्यक्ष सुहास म्हात्रे उपस्थित होते.