गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : साथीच्या आजाराच्या विळख्यातून नवी मुंबईकरांची मुक्तता कऱण्यासाठी प्रभागाप्रभागात आरोग्य शिबिरांचे तातडीने आयोजन करण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सरचिटणिस हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये प्रभागाप्रभागामध्ये ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यूचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. नवी मुंबईकर साथीच्या आजारावरील उपचारासाठी खासगी दवाखाने तसेच खासगी रुग्णालयामध्ये जात असल्याने पालिका प्रशासन दफ्तरी या रूग्णांची नोंद होत नाही. नवी मुंबई सध्या डासांच्या उद्रेकाने त्रस्त झाले आहेत. डासाच्या उपद्रवानेच मलेरिया व डेंग्यूच्या आजाराला खतपाणी मिळत आहे. प्रभागाप्रभागातील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी प्रशासनाने नवी मुंबईतील कानाकोपऱ्यात अगदी इमारतींच्या अंर्तगत भागात, चाळींमध्ये, एलआयजी परिसरात धुरीकरण अभियान व्यापकपणे राबविणे आवश्यक आहे. याशिवाय प्रभागाप्रभागात आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांची रक्त तपासणी, आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून साथीच्या आजार झाल्यावर घ्यावयाची काळजी व आजार होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. सध्या नवी मुंबईत वाढत चाललेले साथीच्य आजाराचे प्रमाण पाहता, आपण धुरीकरण अभियान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.