गणेश इंगवले : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ परिसरात रविवारी, दि. ३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला चोर दहीहंडी उत्सव गोविंदाप्रेमींच्या उपस्थितीत व गोविंदा पथकांच्या सहभागाने उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेश भगत यांनी चोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.
नेरूळ सेक्टर १६ मधील छत्रपती संभाजीराजे उद्यानाजवळ श्री गणेश मैदानात सांयकाळी हा चोर दहीहंडी उत्सव रंगणला होता. आहे. या उत्सवात भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील, गिरिश म्हात्रे, माजी नगरसेविका सौ. माधुरी सुतार, भाजपचे युवा नेते सुनील सुतार, महेश पाटील, भाजप पदाधिकारी राजू तिकोणे, अक्षय पाटील, अजय पावसे, दयानंद कदम, शैलेश भोईर, अंमार मदार, जयनाथ भगत, प्रदीप कलशेट्टी, गोरक्षणाथ गांडाळ, किरण पाटील, शिवाजीराव पिंगळे, बी.जी. कुंभार, वासुदेव पाटील, रवी गावंड, दादासाहेब लोंढे, अरविंदज् जगदाळे, शशिकांत गोरड, ज्ञानदे्व नारखेडे, प्रदीप शिंदे, मंगेश राऊत, मिलिंद पवार, अशोक ठोंबरे, श्रीराम गुप्ता, भरत सकपाळ, तानाजी घोलप, मनोहर कौतुर्डे, राजेंद्र धनावडे, रमेश नार्वेकर, रविंद्र जाधव, बाबासाहेब रोकडे, सदानंद मोरे, विठ्ठल गांजवे, रमेश बोऱ्हाटे, सुधीर पोखरकर, बबन डुकरे, जयकुमार ढमाले, तुकाराम जुनघरे, दिलीप म्हस्के, विलास विधाते, दिलीप सुर्यवंशी, जयसिंग चव्हाण, विमल गांडाळ, संगीता मोरे, उषा सावंत, शुंभागी कलशेट्टी, उषा भगत, संगीता अडके, आदी सहभागी झाले होते.
या चोरहंडी उत्सवात मुंबई, ठाणे, उरण-पनवेलसह नवी मुंबईतील तब्बल ५२ गोविंदा पथके सहभागी झाली होती. या गोविंदा पथकांचा थरार, दहीहंडी फोडण्यासाठीची चुरस, जल्लोष, उत्साह नेरूळवासियांना जवळून अनुभवयास मिळाला.
नेरूळ सेक्टर १६ मधील यंगस्टार क्रिडा मंडळाचे या उत्सवाचे आयोजन केले होते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रूपाली भगत यांच्यासह यंगस्टार किडा मंडळाचे सदस्य तसेच सागर मोहिते, अशोक गांडाळ, विकास तिकोणे, किस्मत भगत, रवी भगत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक भागातील रहीवाशी, सामाजिक कार्यकर्ते, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व स्थानिक रहीवाशांनी परिश्रम घेतले.
या उत्सवात सहभागी झालेल्याचे आयोजक भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेश भगत यांनी संयुक्तपणे आभार मानले आहे.