संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, ऐरोली विधानसभेचे माजी आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेशदादा भगत यांच्या माध्यमातून विभागातील साफ सफाई कामगारांचा शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जीवन ज्योती आश्रम मधील मुलांना भेट वस्तु देण्यात आल्या.
आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेशदादा भगत यांनी सामाजिक संवेदनेचे दर्शन घडविताना परिसरात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याचा गौरव करणे व आश्रमातील मुलांना प्रेम देणे आदी बाबी केल्याने स्थानिक परिसरात हा उपक्रम प्रशंसेचा विषय बनला आहे.