संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “मेरी माती मेरा देश” अभियान हा संपूर्ण भारतभर सुरु झाला आहे. याच अनुषंगाने आज बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवास्थानापासून “मेरी माती मेरा देश” या अभियानाला सुरुवात झाली आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सरकारने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने दिल्ली आणि ७ हजार ५०० गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका’ योजना सुरू केली आहे. ‘मेरी माती, मेरा देश’ या अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ प्रत्येक राज्यातील शहरामध्ये ‘शिलाफलकम’ स्मृती फलकही लावण्यात येणार आहेत. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशानंतर सरकारने “आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत” एक महत्त्वाकांक्षी सहभागात्मक कार्यक्रम आणला आहे. मार्च २०२१ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाला सुरुवात असून शूरवीरांना श्रद्धांजली, ‘मिट्टी का नमन’ आणि ‘वीरों का वंदन’ हे ‘मेरी माती, मेरा देश’ या अभियानाचे मुख्य घटक आहेत.
तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनानुसार “मेरी माटी, मेरा देश” अभियानात सर्व नवी मुंबईकर सहभागी झाले आहेत. भारतमातेच्या वीराप्रती असलेली कृतज्ञता अभिमान व्यक्त करत माझ्या १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील नागरिक या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत घराघरातून माती गोळा केली जात आहे. या मातीच्या माध्यमातूनच अमृत वाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. मी देखील या अभिनायात सहभागी होऊन शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली आणि मातृभूमीला वंदन केले. यावेळी सर्वांनी पंचप्रण शपथही घेतली असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
तसेच कार्यक्रमात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत बेलापूर वार्ड अधिकारी शशिकांत तांडेल, अभिलाशा म्हात्रे, दिलीप वैद्य, राजेश पाटील, श्याम पाटील, विनोद म्हात्रे, दर्शन बहारद्वाज, संतोष पळसकर, गोपाळराव गायकवाड, दामोदर पिल्ले, संजय ओबेरॉय, भूषण पाटील, निलेश पाटील, आरती राऊळ, अलका कामत, किरण वर्मा, गणेश पाटील, सागर शेटे, बंटी शिंदे, किरण झेंडे, आणि इतर कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.