संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, ऐरोलीचे भाजप आमदार, नवी मुंबईचे शिल्पकार असलेले लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री. गणेशजी नाईक ब्लड डोनर चैनच्या वतीने सानपाडा येथे रविवार, दिनांक १७ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
सानपाडा सेक्टर ८ मधील देशस्थ मराठा भवनमध्ये या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता या शिबिरास सुरूवात होणार आहे. आपल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जबाबदारीचे उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी व समाजाला असलेल्या रक्ताची गरज भागविण्यासाठी या शिबिरात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.