`
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर सहा परिसरात ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या तुलसी भवन दुर्घटनेत मयत झालेल्यांना प्रत्येकी पाच लाख रूपये व जखमींना एक लाख रूपयांची तातडीने मदत जाहीर करण्याची लेखी मागणी सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील कॉंग्रेसचे वॉर्ड क्रमांक ८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर सहामध्ये ऑगस्ट २०२३च्या अखेरीस तुलसी भवन या साडेबारा टक्के सोसायटीत दुर्घटना झाली. या बिल्डींगमधील सी विंगमधील सदनिकांच्या हॉलमधील सर्व स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावरील दुकानात आला. पहिला व दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत सोसायटीतील रहीवाशी एक मजुर असे दोघांचे निधन झाले. जखमी झालेल्यांना नेरूळच्याच डीवाय पाटील रुग्णालयात उपचार करण्यात आले. सोसायटीतील रहीवाशी व मजुर दोघेही घरात कमवते असल्याने त्यांच्या घराला आज आधाराची गरज आहे. आज इमारतीत दुर्घंटना घडल्याने इमारतीमधील रहीवाशांना बेघर होण्याची वेळ आली आहे. स्वत:चे घर सोडून इतरत्र भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. इमारत डागडूजी अथवा पुनर्बांधणी किती वेळ लागेल, हेही निश्चित नाही. या दुर्घटनेत बाधीत झालेल्या मृताच्या परिवाराला तसेच जखमींना मदत करण्यास राज्य सरकारकडून का विलंब होत आहे, तेच समजत नाही. आपण रस्त्यावरील अपघातात जखमींना व मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत करतो. या दुर्घटनेतील दोन मयत झालेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रूपये व जखमींना प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत राज्य सरकारने जाहिर करावी व तातडीने देण्याची मागणी सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील कॉंग्रेसचे वॉर्ड क्रमांक ८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
याच मागणीसाठी जीवन गव्हाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २८ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदन सादर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने हे निवेदन “Dr. Sonia Sethi” psec.r&r@maharashtra.gov.in यांना फॉरवर्ड करताच जीवन गव्हाणे यांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना निवेदनातून मदतीसाठी साकडे घातले. राज्य सरकार तुलसी विहारमधील बाधितांना मदत करण्यास स्वारस्य दाखवित नसल्याची नाराजी जीवन गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.