मुंबई : वर्ष २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर आणि ४०० मीटर वैयक्तिक सुवर्णपदक, तर २०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात तिने तीन सुवर्णपदके पटाकाविली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी स्टेफनी राईसला ‘गोल्डन गर्ल’ किताबाने सन्मानित केले होते. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तीन ऑपरेशन केल्यामुळे तीने आपल्या करिअमधून निवृत्ती घेतल्याचे जात आहे. त्यामुळेच तिने लंडन ऑलिम्पिक- २०१२ मध्ये ती सहभागी झाली नव्हती. हीच स्टेफनी राईस ५ ते ८ ऑक्टोबरला कार्यक्रमानिमित्त मुंबई-ठाणे व पुंण्यात येत असून जलतरण क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांना तसेच जलतरण क्षेत्राची रुची असणाऱ्यांना यानिमित्ताने स्टेफनी राईसशी सुंसंवाद साधण्याची आणि मार्गदर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यातील लहान मुलांना बालवयापासून जलतरणाचे प्रशिक्षण देणाऱ्या वेव्हलाइन स्पोर्ट्सने स्टेफनी राईसला निमंत्रित केले आहे. वेव्हलाइन स्पोर्ट्स प्रा. लि. संपूर्ण भारतात मायकेल फेल्प्स जलतरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मास्टर लायसन्स आहे. तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती स्टेफनी राइस, जगतील सर्वात निपुण महिला जलतरणपटूंपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिने रेकॉर्डब्रेक तिन्ही सुवर्णपदके मिळवलीच पण ४:३० च्या आत ४०० मीटर वैयक्तिक मेडल पूर्ण करणारी पहिली महिला म्हणून इतिहासही रचला आहे.
वेव्हलाइन स्पोर्ट्स प्रा. लि.ने ५ ऑक्टोबरला ठाण्यात विहंगचे पाम क्लब, ६ ऑक्टोबरला अंधेरीतील कर्मवीर क्रीडा संकुल, ७ ऑक्टोबरला कांदिवलीतील एव्हरशाईन क्लब, ८ ऑक्टोबर – पुण्यातील एरिया ३७ क्लब येथे स्टेफनी राईस भेट देणार असून येथील कार्यक्रमात मुंबई, ठाणे, पुण्यातील लहान-मोठ्या जलतरणपटूंशी सुसंवाद साधणार असून त्यांना जलतरणाविषयी मार्गदर्शनही करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी +९१ ८२९१७२८८९४ या क्रमाकांवर अधिक संपर्क साधावा असे आवाहन वेव्हलाइन स्पोर्ट्सच्या वतीने करण्यात आले आहे.