गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६- ९८२००९६५७३
नवी मुंबई : खाडीमध्ये होत असलेल्या न्हावाशेवा-शिवडी सागरी पुलामुळे तसेच वाशी खाडीवर होत असलेल्या अतिरिक्त पुलामुळे बाधित होणाऱ्या नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांकडून बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा बेलापुरमध्ये सोमवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांसाठी जेटी असो वा अन्य समस्या असो. समस्या निवारणासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. सागरी सेतु तसेच खाडीपुलावर होणाऱ्या अतिरिक्त पुलामुळे नवी मुंबईतील मासेमारी व्यवसायावर संक्रात येणार असल्याचा धोका ओळखून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांना मंत्रालयीन पातळीवर अथक पाठपुरावा करून आर्थिक मदत मिळवून दिली. याबाबत बेलापुर सेक्टर ३ एमधील वारकरी भवानतील पहिल्या मजल्यावर प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांच्या वतीने सत्काराचे आयोजन केले आहे.
डोलकर मच्छिमार संघटना, फगेवाल मच्छिमार संघटना, एकवीरा मच्छिमार महिला संस्था, खांदेवाले मच्छिमार संस्था यासह गावागावातील अन्य मच्छिमार मंडळांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.