गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : देशामध्ये नव्हे तर जगभरात सर्वाधिक लोकांकडून पाहिला जाणारा ‘मन की बात’ हा एकमेव कार्यक्रम आहे.‘मन की बात’ हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून देशभरातील घडामोडींचे, उल्लेखनीय कामगिरीचे प्रतिबिंब यामधून देशवासियांसमोर येत असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई जिल्हा भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक यांनी केले.
नवी मुंबई जिल्हा भाजपचे महासचिव सुरज पाटील यांनी कुकशेत गावातील महापालिका शाळेमध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून संदीप नाईक उपस्थित होते.
‘मन की बात’ या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या भाषणातील वक्तव्याचा आधार घेत जिल्हाध्यक्ष संदीप नाईक पुढे म्हणाले की, ‘मन की बात’ कार्यक्रमात उल्लेख झालेल्या ग्रामीण व शहरी भागातील उद्योगाला, कुटीरोद्योगाला चालनाच मिळालेली आहे. खादीचा पूर्वीच खप आणि व्यवसाय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी खादीचा नारा दिल्यानंतर खादी व्यवसायात वाढलेली उलाढाल आज देशवासियांना पहावयास मिळत आहे. यासह आदिवासी भागातील प्रगतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिक लक्ष घातल्यावर त्यांचीही प्रगती झाली आहे. जीवनमानात बदल झाला आहे. त्यांच्याही कुटीरोद्योगाला चालना मिळाली आहे. ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमामुळे सर्वच खेळांना व खेळाडूंना गती मिळाली आहे. लोकाश्रय व राजाश्रय वाढला आहे. क्रिकेटनंतर देशात प्रो-कबड्डी खेळ पाहिला जात आहे. खेळामुळे खेळाडूंना रोजगारास मदत मिळाली. त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले आहे. नवी मुंबईतील तब्बल १३० खेळाडू ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून चमकले आहेत. ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सुसंवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची दूरदृष्टी आपणास पहावयास मिळते. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही विकास व्हावा, रोजगार निर्माण व्हावा, स्थानिक कुटीरोद्योगांना चालना मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देशवासियांना मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी सांगितले.
‘मन की बात’ कार्यक्रमाचे कमी वेळेत कुकशेतच्या शाळेत सर्वांसाठी चांगले नियोजन केल्याबाबत संदीप नाईक यांनी कार्यक्रमाचे आयोजक सुरज पाटील यांची प्रशंसा केली. सुरज पाटील हा सर्वस्पर्शी उमदा माणूस असून लोकनेते गणेश नाईक यांच्या मुशीत घडलेला कार्यकर्ता आहे. गणेश नाईकांना अपेक्षित असलेली लोककल्याणकारी कामे करण्यात सुरज पाटील नेहमीच आघाडीवर असल्याचे सांगत संदीप नाईक यांनी सुरज पाटील करत असलेल्या कार्याचा आढावा घेत प्रशंसा केली.
या कार्यक्रमास माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, माजी नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर, प्रभाग ८४ चे भाजप वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कुकशेतसह सारसोळे गावचे ग्रामस्थ, नेरुळ सेक्टर सहाचे रहीवाशी, स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक सुरज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आभार मानले. ‘मन की बात’ कार्यक्रमानंतर भाजप जिल्हा महसचिव सुरज पाटील यांनी भाजपच्या विविध अॅपबाबत संबंधितांना मार्गदर्शन करत भाजपच्या कार्याची माहिती दिली.