नवी मुंबई : भारत देशाचे लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी हाती घेतलेल्या रोजगारा विषयक युवाशक्तीला बळकटी देण्याकरिता त्यांना स्वयंरोजगार देणे हे महत्वाचे आहे. तसेच दहावी आणि बारावीचे वर्षे विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा जीवनाला वेगळे आणि महत्वाचे वळण मिळत असल्याने शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन व सुयोग्य करिअर मार्गदर्शन शिबीर उपयुक्त असते याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई यांच्या वतीने २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सीबीडी येथील सेक्टर-३ ए, वारकरी भवन येथे रोजगार मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा एकच ध्येय आहे की युवा पिढीच्या समस्या व त्यांचे प्रश्न जाणून घेणे व त्यांना रोजगारा संदर्भात योग्य मार्गदर्शन देवून त्यांना व्यवसायामध्ये प्रोत्साहित करणे व युवा शक्तीला बळकटी देणे हे आहे. तसेच या शिबिराद्वारे तरुण-तरुणींना तसेच विद्यार्थ्यांना संदेश देण्यात येत आहे की येणाऱ्या युवा पिढीला रोजगारा संदर्भात योग्य ते मार्गदर्शन व योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे. तसेच मी आमदार झाल्यापासून ५०० गोर गरीब कर्मचारी हे कामावर लावले असून ते आज व्यवस्थितरित्या कामावर रुजू आहेत.
तसेच रोजगार मार्गदर्शन शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंटीग्रिटी करिअर सोलुशनचे संचालक युवराज पवार यांनी भविष्यातील करिअर, नियोजनाविषयी, करिअरमधील विविध पर्याय व अभ्यासक्रमाविषयी तरुण-तरुणींना तसेच विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसाय तसेच करिअर संबंधित योग्य ते मार्गदर्शन केले. दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक दिपक पवार, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका सुरेखा नरबागे, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव गायकवाड, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, राजेश रॉय, विकास सोरटे, समाजसेवक पांडुरंग आमले, राजेश रॉय, सुहासिनी नायडू, जयश्री चित्रे, आरती राऊल, संदेश पाटील, संजय ओबेरॉय तसेच असंख्य विद्यार्थी व तरुण-तरुणी उपस्थित होत्या.