• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 5, 2023

 ‘आदिवासी भवनाचे’ लोकार्पण संपन्न

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
 ‘आदिवासी भवनाचे’ लोकार्पण संपन्न

सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले सबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी बांधव असे सामान्यप्रमाणे म्हणता येईल. सर्वसाधारण जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यात व संस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात. नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबद्ध समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्टयपूर्ण चालीरीती किंवा संस्कृती आदिवासींत आढळतात. परंतु नवी मुंबईमधील सीबीडी येथील आदिवासी बांधवांना ही आपली संस्कृती जपत आपले सांस्कृतिक कार्यक्रम ही कायम अजरामर राहावे म्हणून सीबीडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, भूखंड क्र. १३, सेक्टर- ८, येथे आदिवासी बांधवांनाकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधीमधून “आदिवासी भवन” उभारण्यात आले असून त्याचे लोकार्पण नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

तसेच आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, बेलापूर क्षेत्रातील सीबीडी येथील सेक्टर-८ मधील आदिवासी बांधवांना त्यांचे पारंपारिक कार्यक्रम साजरे करण्याकरिता, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, शिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी, त्यांचीकडे असणारी हस्तकला, वेगवेगळ्या महिला बचत गटांतून करणारे काम, मुलींना प्रशिक्षण हे सर्व नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार असून यासाठी या आदिवासी भवनाचा उपयोग होणार आहे. तसेच आदिवासी बांधवांकरिता माझ्या आमदार निधीमधून २५ लाख निधी उपलब्ध करून  “आदिवासी भवन” उभारले आहे. आदिवासी बांधवांची लोककला व संस्कृती टिकावी यासाठी उभारण्यात आलेल्या या आदिवासी भवनामुळे आदिवासी समाजाला आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून आदिवासी समाजाची संस्कृती टिकावी व येणाऱ्या पिढ्यांना कळावी हाच मुख्य हेतू आहे. आज या भवनाचे लोकार्पण करताना खऱ्या अर्थाने बेलापूर पट्टीतील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तसेच या उद्घाटन प्रसंगी आदिवासी जीवनशैलीतील नृत्य आणि लोकनृत्याचा अनोखा संग्राम जपत कमल आनंद कला मंच आणि आशिमिक कामठे प्रस्तुत “वारसा माझ्या महाराष्ट्राचा” या सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता.

तसेच सीबीडी येथील सेक्टर-८ मध्ये आदिवासी बांधवांना “आदिवासी भवन” उभारून दिल्याबद्दल आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य (नवी मुंबईच्या) वतीने आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत त्यांचा भव्य सत्कार ही करण्यात आला.

 यावेळी माजी नगरसेवक साबू डॅनियल, माजी नगरसेविका राधा ठाकूर, माजी नगरसेविका सुरेखा नरबागे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेवक दिपक पवार, माजी नगरसेवक सुनिल पाटील, माजी परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, राजेश रॉय, समाजसेवक पांडुरंग आमले, भूषण ठाकूर, अॅड. सुहास वेखंडे, अॅड. संतोष पळसकर, जग्गनाथ जगताप, संजय ओबेरॉय, रवी ठाकूर, प्रभाकर कांबळे, सुभाष गायकवाड, चंद्रकांत पाटील, सुधाकर सोनावणे, नारायण मार्के, चंद्रकांत कोळी, मोहन मुकादम, मनोज भगत, प्रकाश मुकादम, आरती राऊल, शितल जगदाळे, अलका कामत, सुरेखा बामणकर, ममता सिंग, स्मिता सावंत, तसेच महापालिका अधिकारी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त समाज विकास विभाग श्रीराम पवार, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता विद्युत विभाग संजीव पाटील, उप अभियांत्रिकी अजय पाटील व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गावातील पाणीटंचाईवर तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

Next Post

नेरूळ सेक्टर १६, १६ ए, १८ मधील पाण्याची समस्या सोडवा : गणेश भगत

Next Post
नेरूळ सेक्टर १६, १६ ए, १८ मधील पाण्याची समस्या सोडवा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर १६, १६ ए, १८ मधील पाण्याची समस्या सोडवा : गणेश भगत

ईर्शाळवाडीच्या रहिवाशांसमवेत डॉ. श्रीकांत शिंदेंची दिवाळी साजरी

ईर्शाळवाडीच्या रहिवाशांसमवेत डॉ. श्रीकांत शिंदेंची दिवाळी साजरी

नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना १३ नोव्हेंबरपासून एनएमएमटीचा मोफत प्रवास

नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना १३ नोव्हेंबरपासून एनएमएमटीचा मोफत प्रवास

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com