नवी मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्त्रोत ठरलेल्या ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोकनेते आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक अशोक पाटील, लोकसभा विस्तारक अरुण पडते, माजी नगरसेवक राजेश शिंदे, युवा नेते संकल्प नाईक, दिनेश पारेख, राजेंद्र इंगळे, कैलाश गायकर, शिवाजी खोपडे, वकील जब्बार खान, वैशाली पाटील, राजेंद्र जोशी, मुकेश पष्टे, संतोष मुळे, जयश्री पाटील, वृषाली कोटकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, नवी मुंबई भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकर अनुयायांनी देखील आदरांजली अर्पण केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या अजोड राज्य घटनेमुळे आजही देश एकसंघ असून प्रगती करतो आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी विविध अंगांनी विकसित भारताचा पाया रचला, या शब्दांमध्ये लोकनेते आमदार नाईक यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव केला. तर राष्ट्र निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान अमूल्य असून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले.