नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४ मध्ये पालिकेकडून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेरूळ सेक्टर २ आणि ४ परिसरामध्ये महापालिकेकडून दूषित होण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक रहीवाशी चिंतातूर व भयभीतही झालेलर आहेत. ज्यावेळी जलवाहिन्यांची कामे होतात, दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहील्यास एक-दोन दिवस दूषित अथवा गढूळ पाणी येणे एकवेळ समजण्यासारखे आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्याने नेरूळ सेक्टर २ व ४ परिसरामध्ये पाणी दूषित येवू लागले आहे. स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. पाणी गाळून व उकळून घ्यावे लागत आहे. समस्या गंभीर आहे. स्थानिक रहीवाशांमध्ये आरोग्याप्रती चिंता पसरली आहे. समस्या गंभीर आहे. उद्या या दूषित पाण्यामुळे रहीवाशी गंभीर आजारी पडण्याची तसेच दगावण्याचीही भीती रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे. समस्येचे गांभीर्य पाहता, तातडीने संबंधितांना येणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.