अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि नवी मुंबईच्या राजकारणातील जनहितैषी मुरब्बी नेतृत्व नामदेव भगत यांची महाराष्ट्र सरकारने ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे खंदे समर्थंक म्हणून ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात ओळख आहे. जवळपास १० वर्षे त्यांनी सिडको संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळताना आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. नेरूळमधील आगरी कोळी भवन, उलव्यातील भुमीपुत्र भवन यासह अनेक कामे सिडकोच्या माध्यमातून नामदेव भगत यांनी केली आहेत. महापालिका सभागृहात २०००पासून ते कार्यरत आहेत. त्यांनी स्वत:च्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो गरीब व गरजू मुलांना शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अत्यल्प दरात तसेच वेळ पडल्यास मोफत शिक्षण उपलब्ध करुन देण्यास पुढाकार घेतला आहे. रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालक-मालकांच्या समस्या गेल्या अडीच दशकापासून ते सोडवत आहेत. अनेक बेरोजगारांना रोजगारही नामदेव भगत उपलब्ध करून देत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आयोजनाच्या माध्यमातून गेली ३० वर्षे विविध जनहितैषी उपक्रम राबवत आहेत. नवी मुंबईतील स्थानिक आगरी-कोळी लोकांची संस्कृती नंतर या शहरात येणाऱ्यांना समजावी यासाठी नेरूळमध्ये गेली अनेक वर्षे नामदेव भगत हे आगरी-कोळी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करत आहेत. जिल्हा नियोजन समितीवर नामदेव भगत यांची नियुक्ती झाल्याने सरकारने त्यांच्या जनसेवी कार्याची दखल घेतली असल्याचे नवी मुंबईत बोलले जात आहे. नामदेव भगत यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील अन्य पाच जणांचीही महाराष्ट्र सरकारने जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियु्क्ती केली आहे.