अनंतकुमार गवई : Navimumbalive.com@gmail.com
नवी मुंबई : शनिवार, दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी नेरूळ-जुईनगरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून नेरूळ-जुईनगर नोडमध्ये आज शुक्रवार दि. २९ डिसेंबर रोजी सांयकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच दर शनिवारी नेरूळ-जुईनगर नोडमध्ये महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे आज शुक्रवारी सांयकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारी महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे नेरूळ-जुईनगर नोडमधील रहीवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचे संकट आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने शनिवार, दि. ३० डिसेंबर रोजीचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.