सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभेच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून बनविण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सभागृहाचे सोमवार, दि. १ जानेवारी रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता दिवाळे गाव, सेक्टर १४, मच्छि मार्केटजवळ हा उद्घाटन सोहळा होत आहे. दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भेट दिली असल्याची संबंधित परिसरात चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमास स्थानिक परिसरातील रहीवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.