सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : संपूर्ण भारत देशाचे लक्षकेंद्रित असलेले अयोध्यानगरीतील राम मंदिराची तयारी जोरात सुरु असून श्री रामाचे बाल रूप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना येत्या सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.
रामललाच्या या अभिषेक सोहळ्यात भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यासर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्थळ : सुनील गावस्कर मैदान सेक्टर-१ सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे रामजन्म महाआरती दीपोत्सव सोहळा मोठ्या थाटा माटात पार पडणार असून त्यानिमित्ताने श्री राम भक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच नवी मुंबईतील सर्व श्री राम मंदिर व सर्व धार्मिक मंदिरांमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.