अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज खैरणे एमआयडीसी येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.
नवी मुंबईतील विविध प्रभागातून आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न आणि समस्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष नाईक यांना निवेदने देण्यासाठी गर्दी केली होती. त्याचबरोबर नवी मुंबई भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी देखील जिल्हाध्यक्ष नाईक यांना निवेदने दिली. नागरी सोयी-सुविधा, आरोग्य, शिक्षण, प्रशासकीय दिरंगाई, पर्यावरण इत्यादी विषयाची निवेदने प्राप्त झाली. अनेक निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. विशेषतः नागरी सुविधांच्या बाबत जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून कामे करण्याच्या तसेच समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले. प्राप्त निवेदनांपैकी उर्वरित निवेदनांवर कालबद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी एका महत्त्वाच्या विषयाकडे जिल्हाध्यक्ष नाईक यांचे लक्ष वेधले. नेरूळ, जुईनगर परिसरामध्ये असलेल्या खाजगी रुग्णालयांमधून आयुष्यमान भारत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. काही रुग्णालयांची नावे योजनेच्या यादीमध्ये आहेत परंतु प्रत्यक्ष जेव्हा नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णालयामध्ये जातो त्यावेळेस योजनेचा लाभ न देता गरजू रुग्णाकडून पैसे मागितले जातात. उपाध्यक्ष डॉक्टर पाटील यांनी जिल्हाध्यक्ष नाईक यांना या गंभीर प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली असता महापालिकेचे आयुक्त आणि त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले जाईल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी दिले. शासनाच्या वतीने निर्देश काढून प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर शासकीय आरोग्य योजनांच्या माहितीचा सूचनाफलक लावण्यात येणार आहे. खाडी किनारी पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या मँगो मार्शल या संस्थेचे पर्यावरण संरक्षक कार्यकर्ते रोहित मल्होत्रा यांनी या संवाद बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची भेट घेतली. संस्थेच्या वतीने लवकरच राबविण्यात येणाऱ्या १५० व्या स्वच्छता मोहिमेप्रसंगी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
भाजपा जिल्हा महामंत्री अनंत सुतार, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, महिला मोर्चा प्रमुख माधुरी सुतार, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख राजेश राय, लोकसभा विस्तारक अरुण पडते, विस्तारक आप्पा मुळे यांच्यासह सर्वश्री लीलाधर नाईक, शशिकांत भोईर, शंकर मोरे, रमेश डोळे, राजेश शिंदे, अशोक पाटील, सुरेश शिंदे, एडवोकेट अंशू वर्धन, राजेश मढवी, राजेंद्र इंगळे, शशी दामोदरन, संदीप म्हात्रे, विकास झंजाड, दाजी सणस, बंड्या म्हात्रे, शिवराज मढवी, जयश्री कातकरी, सुभाष गायकवाड, यल्लू शिंगे, रॉबिन मढवी आदी मान्यवर या संवाद बैठकीला उपस्थित होते.