स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करताना प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन नेरुळ व जुईनगर येथील प्रत्येक काँग्रेस कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी त्या त्या परिसरातील स्थानिक लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून जिलेबी वाटण्यात आली.
यावेळी नवी मुंबईमध्ये मराठा मोर्चासाठी आलेल्या मराठा बांधवांना नाष्टा चहापाणी याची व्यवस्थाही कॉंग्रेसच्या कार्यालयात करण्यात होती. श्रीमती विद्या भांडेकर यांनी या मोर्चेकऱ्यांसाठी भाकरी, चटणी, मिरचीचा ठेचा अशी भोजनाची व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरणही मराठा मोर्चासाठी आलेल्या मराठा बांधवांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी नेरूळ व जुईनगर नोडमधील स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.