विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com
उरण : अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचे दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन आगरी समाज सभागृह पनवेल येथे आदरणीय लोकनेते ‘दि.बा. पाटील साहेब साहित्य नगरी’ या नावाने संपन्न झाले. सदर संमेलनात संस्थापक कैलास पिंगळे आणि कार्यकारिणी यांच्या सुनियोजनाने चहापाणी नाश्ता भोजनासह अनेक कार्यक्रम संपन्न झाले. विशेष म्हणजे समस्त आगरी समाजातील कवी- साहित्यिक- कलागुणींना २०२४ वर्षीय पुरस्काराचे मानकरी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये कवी/लेखक/गायक/वाद्य वादक असे बहुगुणी अरुण दत्ताराम म्हात्रे (जासई-उरण) यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि ‘आगरी कला गौरव’ हे प्रतिमा रूपी विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अरुण द. म्हात्रे यांनी साहित्य क्षेत्रात भरारी घेत असताना आगरी अस्मिता जपली. परंपरा संस्कृती यांचे भान राखून कार्य केले. साहित्य शारदेच्या सेवेसह कलेची बांधिलकी जपली. आणि कला प्रांतात बहुविध स्वरूपाचे प्रशंसनीय कार्य केले; करत आहेत. यामुळे सुपरिचित अरुण द. म्हात्रे यांचे विविध क्षेत्रातून आणि सर्व स्तरातून स्तुती सुमनांसह विशेष कौतुक होत आहे.