वसंत गोपाळे : स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील उलवे येथील भुमीपुत्र भवनच्या लोर्कापणाचे सिडकोला आदेश देणेबाबत अन्यथा एमआयएम या भूमीपुत्र भवनचे उद्घाटन करेल असा इशारा एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
हाजी शाहनवाझ खान यांनी ५ जानेवारी २०२४ रोजी याच विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. तथापि त्यानमतर सिडकोच्या काही अधिकाऱ्यांनी हाजी शाहनवाझ खान यांची भेट घेत प्रजासत्ताक दिन, मराठा आंदोलन व अन्य कारणामुळे आपण असे करू नका, आम्ही लवकरात लवकर भुमीपुत्र भवनचे लोर्कापण करू असे सांगितले. तथापि सिडकोकडून काहीही हालचाली सुरु न झाल्याने पुन्हा मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केल्याची माहिती हाजी शाहनवाझ खान यांनी दिली.
नवी मुंबई शहरालगतच लागून असलेल्या उलवे नोडमध्ये सिडको प्रशासनाने भुमीपुत्र भवनची निर्मिती केलेली आहे. या भवनचे बांधकाम होवून व त्याला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळूनही जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. या भवनसाठी सिडकोने जवळपास ८५ कोटींचा निधी खर्च केलेला आहे. एकादी जनजकल्याणासाठी निर्माण केलेली वास्तू जनतेच्या वापरासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तथापि केवळ उद्घाटनासाठी दोन वर्षाचा कालावधी घालविणे हे सिडकोला शोभनीय नाही. स्थानिक ग्रामस्थांना, भुमीपुत्रांना तसेच अन्य रहीवाशांना सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यासाठी इतरत्र महागड्या दराने हॉल घ्यावे लागत आहेत. भुमीपुत्र भवनचे लोर्कापण झाल्यास ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना स्वस्त दरात कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध होईल व स्थानिक परिसरातील अन्य रहीवाशांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. योगायोगाने प्रजासत्ताक दिवस २० दिवसांवर आलेला आहे. या दिवशी भुमीपुत्र भवनचे लोर्कापण करंण्यात यावे. सिडकोने उद्घाटन हा विषय प्रतिष्ठेचा न बनविता जनतेला सुविधा देण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
केवळ उद्घाटनासाठी सिडकोने दोन वर्षाचा कालावधी घेतला आहे. भुमीपुत्र भवन बांधून सुसज्ज आहे. सिडकोने लवकरात लवकर या भुमीपुत्र भवनचे लोर्कापण करावे अन्यथा एमआयएम स्वत: पुढाकार घेवून या भवनाचे उद्घाटन करेल असा इशारा हाजी शाहनवाझ खान यांनी दिला आहे.
यासंदर्भात आपणास आम्ही ५ जानेवारी रोजी हे निवेदन दिले असता प्रजासत्ताक दिवस, मराठा आंदोलन पाहता आपण आंदोलन करू नये , लवकरात लवकर भुमीपुत्र भवनचे उद्घाटन करण्यात येईल असे सिडकोच्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला भेटून सांगितले. तथापि आता मराठा आंदोलन झाले, प्रजासत्ताक दिनही झाला. आता सिडकोने लवकरात लवकर भुमीपुत्र भवनचे लोर्कापण करावे अन्यता एमआयएमला या भुमीपुत्र भवनच्या लोर्कापणासाठी पुढाकार घ्यावा लागेल आणि एमआयएम स्वत:च भुमीपुत्र भवनचे लोर्कापण करेल , असे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.