स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा येथील श्रीदत्त मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सर्विस रोडचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सर्विस रोड व संरक्षण भिंत यासाठी ४ कोटी मंजूर व ३ कोटी १५ लाख रुपये सर्व्हिस रोडसाठी व संरक्षण भिंतीसाठी ८३ लाख रुपये मंजुर झाले आहेत.
अनेक दिवस स्थानिक लोक प्रयत्न करत होते. कारण दत्त मंदिर हे जागृत देवस्थान आहे. तिथे यात्रा जत्रा भरते व अनेक भाविक दर्शनाला येतात. परंतु काही काळापासून श्री दत्त मंदिरामध्ये जत्रेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना रस्ता हा अरुंद पडत असे. त्यामुळे भाविकांना गाड्या ये- जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा त्रास सहन करावा लागत होता. तसेच हजारो लोक दत्त जयंतीच्या दिनी असलेल्या भंडाराचा लाभ घेतात. त्यासाठी तेथे फार गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सानपाडा ग्रामस्थांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मागणी केली. व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या समस्येचे गांभीर्य जाणून घेतले व त्यांच्याच प्रयत्नांनी हा अनेक वर्षाचा प्रश्न सोडविला गेला.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन केले व कामाला सुरवात झाली. यामुळे सानपाडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ग्रामस्थांच्या अनेक अडचणी ऐकून घेतल्या व त्यावर लवकरच मार्ग काढणार असल्याचे उपस्थितांना सांगितले. तसेच संबंधित अडचणीवर अधिकाऱ्यांशी मंदाताई यांनी चर्चाही केली आहे.
भुमिपूजनासाठी सदानंद पाटील, बाळराम पाटील, सोमनाथ वास्कर, दिलीप मढवी, महेश मढवी, भार्गव मढवी, रुपेश मढवी, अंबाबाई रघु दळवी, चांगुबाई चिंतामण वास्कर, लक्ष्मी वसंत ठाकूर, सानपाडा ग्रामस्थ व पालक वर्ग सर्व उपस्थित होते. तेथे या सर्व मान्यवरांच्या हस्ते सौ. मंदाताई म्हात्रे यांचे भव्य सत्कार करण्यात आले.