नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत देश विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मार्फत जनतेच्या विकासासाठी सादर केलेल्या सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि पालिका अधिकाऱ्यांचे अभिनदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगात उच्च दर्जाचे स्थान प्राप्त करण्यासाठी विकासाच्या व जनहिताच्या अनेक योजना राबविण्यास देशभर सुरुवात केली आहे. या योजनांमार्फत समाजातील गोरगरीब जनतेला विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. त्याकरिता केंद्र शासनामार्फत पंधराव्या वित्त आयोगामार्फत तसेच अमृत योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे यामध्ये आरोग्य सेवा पर्यावरण संरक्षण ,महिला बालकल्याण , पेयजल व्यवस्था सौरऊर्जा सुशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार नागरी दळणवळण सुविधा यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी रक्कम रुपये ४९५० कोटी रुपयांचा सादर केलेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत देश विकासाच्या संकल्पनेचा समावेश असून त्यानुसार महानगरपालिकेने जनतेच्या हितासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अर्थसंकल्पात मी यापूर्वी मागणी केल्याप्रमाणे नवी मुंबई शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी मोरबे धरण येथे एमबीआर बांधणे, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते बांधणी, शहरांमध्ये आवश्यक तेथे उड्डाणपूल बांधणे, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे महिला व तरुणांना स्वयंरोजगारासाठी उपाय योजना, लीडार सर्वेक्षण करून महापालिका उत्पन्नात वाढ करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा केंद्र ,सेंट्रल लायब्ररी विष्णुदास भावे येथे ग्रंथालय प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अद्ययावत सुविधा, अत्याधुनिक पद्धतीने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, सार्वजनिक रुग्णालयात सिटीस्कॅन तसेच mammography सुविधा, दिव्यांगांसाठी सुविधा शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसी कॅमेरे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपत्ती प्रतिसाद पथक निर्मिती, गतिमान प्रशासनासाठी जनतेला सुविधा विहित मुदतीत देण्याकरिता ई ऑफिस प्रणाली चा वापर करणे या सर्व विकासाच्या गोष्टी आपण अंदाजपत्रकात समावेश करून अंदाजपत्रक सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सादर केल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.