भुखंड, शासकीय मदत, आमदार निधीसाठी मदतीची आमदार मंदाताई म्हात्रेंची तयारी
स्वयंम पीआर एजंन्सी : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : देशातील अग्रमानांकित स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विकासाच्या अनेक योजना, उद्योगधंदे उभे राहत असून, वाढत्या नागरी सुविधा व रोजगार, स्वयंरोजगार यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे. सिडकोने निर्मिलेल्या शहराच्या विकास योजनांमध्ये काही उणिवा आहेत. त्यामध्ये महत्त्वपूर्ण असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र व संक्रमण यादी यांचा समावेश आहे. ते तत्काळ उभारावे, त्यासाठी आमदार निधीसह इतर शासकीय मदत व भूखंड मिळवून देण्यात मदत करेल, अशी ग्वाही बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्राद्वारे आयुक्तांना दिली आहे.
महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र येत असून, या क्षेत्रामध्ये अनेकदा अपघात घडतात. तसेच शहरात अनेक ठिकाणी जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. शहराला समुद्रकिनारा लाभला असून, शहराच्या सुरक्षिततेकरिता उपाययोजना करणे आवश्यक आहे. नवी मुंबई भूकंप प्रवण क्षेत्रात येत असून, नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मध्यवर्ती ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्र व संक्रमण कॅम्प उभारण्यात यावे. त्याकरिता मनपा अंदाजपत्रकात केलेल्या आर्थिक तरतुदीसह राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदानातून खर्च करावा. शिवाय राज्य शासन व सिडकोकडे भूखंड मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यास मी तयार आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे