स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथे शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवार, दि. ८ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यत महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता रुद्राभिषेकाने या महाशिवरात्री उत्सवास सुरुवात होणार आहे. सकाळी ८ वाजता मांडव डाहाळे आणि हारतुतरेचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९.३० वाजता ह.भ.प भरत महाराज थोरात (राजगुरुनगर) यांचे किर्तन होणार आहे. सकाळी ११.३० वाजल्यानंतर महाप्रसादास सुरुवात होणार आहे. रात्री ९ वाजता श्रीराम प्रासादि भजनी मंडळाच्या वतीने जागरचा कार्यक्रम होणार आहे.
या महाशिवरात्री उत्सवासाठी श्रीराम ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशशेठ वऱ्हाडी, श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश गावडे, पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेशशेठ खांडगे, पिंपळगावचे उपसरपंच सोपान खांडगे, पत्रकार सुरेश वाणी यासह विविध ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे. या महाशिवरात्री उत्सवात जुन्नर तालुक्यातील शिवभक्तानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष जयेशभाऊ खांडगे यांनी केले आहे.