एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असला तरी महाराष्ट्रात काही मतदारसंघापुरता तोही मुस्लिमबहूल विभागापु्रताचा सिमित राहीलेला आहे. या पक्षाला बिगर मुस्लिमेत्तर समाजामध्ये आजही आपले स्थान निर्माण करण्यात मर्यादा पडलेल्या आहेत. २०१४ साली झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये एमआयएमचे दोन आमदार निवडून आले होते आणि २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्येही एमआयएमचे दोनच आमदार निवडून आले होते. त्यात एमआयएमला भायखळ्याची जागा २०१९ साली गमवावी लागली आणि धुळे शहराची जागा एमआयएमला नव्याने मिळाली. धुळ्याची जागा ही मतविभागणीमुळे आणि अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे एमआयएमला प्राप्त झालेली आहे.
एमआयएम म्हटले की आयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल आणि त्या त्या दोन विधानसभा मतदारसंघापुरते धुळे शहरचे आमदार फारख शाह आणि मालेगाव मध्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल या दोन आमदारांपुरतीच सिमीत राहीलेली आहे. वारिसभाई पठाण या अभ्यासू प्रवृत्तीच्या माजी आमदाराचे नाव अधूनमधून मीडियाच्या चर्चेत येते. बाकी एमआयएममध्ये कोण कार्यरत आहे. कोण पदाधिकारी आहेत, याची फारशी कोणाला माहितीही नाही. त्या तुलनेत नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये नावारूपाला आलेले एक नाव म्हणजे हाजी शाहनवाझ खान हे होय.
हाजी शाहनवाझ खान हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असे नाव आहे. सातत्याने जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालय ते त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाठपुरावा करणारे, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणारे, निवेदनांचा पाऊस पाडणारे आणि वेळप्रसंगी आंदोलन करणारे म्हणजेच हाजी शाहनवाझ खान हे नाव होय. हाजी शाहनवाझ खान यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून झालेली आहे. मनसेमध्ये कार्यरत राहून त्यांनी अल्पावधीतच मनसेचा शाबीरभाई शेख अशी नवी मुंबईकरांमध्ये प्रतिमा निर्माण केलेली होती. राज ठाकरे यांचा कडवट अनुयायी म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये हाजी शाहनवाझ खान यांना ओळखले जात होते. नेरूळ-सीवूड भागात हाजी शाहनवाझ खान यांचा वाढता जनाधार, लोकप्रियता हीच पक्षांतर्गत पातळीवर त्यांचे हितशत्रू वाढविण्यास कारणीभूत ठरली. राज ठाकरे नवी मुंबईत आले असताना एनएमएसएच्या प्रागंणात शाहनवाझ खान यांच्याशी सीवूड भागातील घटकांनी निर्माण केलेला वाद आणि त्याप्रकरणी मनसेच्या अन्य घटकांपैकी कोणीही शाहनवाझ खान यांची सोबत न केल्याने ज्या पक्षासाठी आपण राबतोय, तिथेच आपण एकाकी पडत असल्याने हाजी शाहनवाझ खान यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आणि काही काळ अलिप्त राहत त्यांनी विचारपूर्वक एमआयएम पक्षसंघटनेत कार्यरत होण्याचा निर्णय घेतला.
एमआयएममध्ये आजमितीला हाजी शाहनवाझ खान हे एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव असून एमआयएमचे नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे प्रभारी आहेत. नवी मुंबई ते कोकण या भौगोकिलदृष्ट्या विस्तिर्ण अशा भूभागामध्ये एमआयएमचे अस्तित्व निर्माण करणे, पक्षासाठी जनाधार उभा करणे, पक्षसंघटना बळकट करणे हे साधे काम नव्हते. हेच अशक्यप्राय वाटणारे काम शक्य करण्यासाठी हाजी शाहनवाझ खान कार्यरत आहेत. त्यांच्या प्रत्येक कामाची मीडियामध्ये आणि जनसामान्यांमध्ये दखल घेतली जात असल्याने मीडिया आणि जनसामान्यांमध्ये नवी मुंबई ते कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये एमआयएम म्हटल्यावर हाजी शाहनवाझ खान यांचेच नाव प्रथम कोणाच्याही ओठावर येते आणि वस्तूस्थिती आहे. ही वस्तूस्थिती हाजी शाहनवाझ खान यांच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा रखडलेल्या प्रकल्पासाठी सरकारला सातत्याने गेली काही वर्षे धारेवर धरत लेखी निवेदनातून महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचे काम हाजी शाहनवाझ खान करत आहेत . याशिवाय नवी मुंबईसह, पनवेल, उरण तालुक्यातील सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हाजी शाहनवाझ खान महापालिका ते मंत्रालय सातत्याने लेखी निवेदने देवून सर्वसामान्यांची दखल घेण्यास प्रशासनाला भाग पाडत आहेत. सर्वसामान्यांच्या समस्येची तीव्रता प्रशासनाला पटवून देण्यासाठी महापालिका ते मंत्रालय चपला झिजविताना अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे. अनधिकृत बॅनरमुळे त्या त्या शहराला येत असलेला बकालपणा, प्रशासनानचे होत असलेले आर्थिक नुकसान पाहता अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यास व शहरास बकालपणा आणून त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक नुकसान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी हाजी शाहनवाझ खान पाठपुरावा करत आहे. हाजी शाहनवाझ खान यांच्या कार्यामुळे नवी मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एमआयएम नव्याने बाळसे धरु लागलेली आहे. जनसामान्यांमध्ये नव्याने चर्चेत येवू लागलेली आहे. नवी मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एमआयएमची पक्षबांधणी करण्याचे आव्हान हाजी शाहनवाझ खान यांच्यापुढे आहे. एमआयएम म्हणजेच मु्स्लिमांचा पक्ष ही ओळख न राहता एमआयएम म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकाचा पक्ष ही ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न हाजी शाहनवाझ खान यांनी चालविला आहे. येत्या लोकसभा व त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत एमआयएमला नवी मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मतपेटीतून जनाधार निर्माण करण्याचे अग्निदिव्य हाजी शाहनवाझ खान यांना पेलावे लागणार आहे. शिवजन्मभूमीच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करता कै. उत्तम विष्णू खांडगे व श्री. चंद्रकांत विष्णू खांडगे यांच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेवर पोलीस प्रशासनाच्या बळावर जिल्हा परिषदेने अतिक्रमण केले आहे. याविरोधात हाजी शाहनवाझ खान मंत्रालयीन पातळीवर या दोन मराठा समाजातील शेतकरी परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी हाजी शाहनवाझ खान संघर्ष करत आहेत. या शेतकरी परिवाराला न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याची भिष्मप्रतिज्ञा हाजी शाहनवाझ खान यांनी केलेली आहे.
समाजातील प्रत्येक घटकांसाठी हाजी शाहनवाझ खान कार्यरत आहे. नवी मुंबईसह पनवेल, उरण भागातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत. चर्मकार समाजामध्ये हाजी शाहनवाझ खान यांचे विशेष स्थान आहे. एमआयएमसाठी नवी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागामध्ये हाजी शाहनवाझ खान यांचे कार्य येत्या नजीकच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. कोकण भागातील एमआयएमचा पोलादी बुरुज म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये हाजी शाहनवाझ खान यांचा उल्लेख होत आहे. एमआयएम हाजी शाहनवाझ खान यांच्या कार्याची कितपत दखल घेते, या नेतृत्वाला आणखी कोणती जबाबदारी सोपवते, हे आगामी काळात पहावयास मिळणार आहे.
0000000000000
- स्वयंम न्युज ब्युरो
- Navimumbailive.com@gmail.com
- ८३६९९२४६४६