स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या संकल्पनेने देशातील करोडोपेक्षा जास्त महिलांना जोडून घेण्याकरिता भाजपाच्या वतीने ‘नारी शक्ती वंदन’ अभियान हाती घेण्यात आले आहे. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून नेरुळ येथील तेरणा हायस्कूल मैदान, सेक्टर-१२ नेरुळ (पच्छिम), नवी मुंबई या ठिकाणी ’जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून ‘महिला मेळाव्या’चे आयोजनाचे उद्घाटन ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते दिप्रज्वलन करून झाले. तसेच हजारो महिलांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘नारी शक्ती वंदनाचे’ थेट प्रक्षेपण पाहण्यात आले.
महिला सक्षमीकरणासाठी भाजपा हा एकमेव पर्याय असल्याची भावना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला राजमाता जिजामाता, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, अशा कणखर व सक्षम महिला नेतृत्त्वाची परंपरा आहे. राजकारण, साहित्य, संगीत, कला, अर्थशास्त्र, विज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपल्या महिलांनी मोठी कामगिरी केली आहे. आज विधिमंडळात लोकांचे प्रश्न मांडताना माझ्या मनात या सगळ्या महिलांची प्रतिमा असते. महिला शक्तीच या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे नेईल. त्या विचारातूनच हा जागतिक महिला मेळावा आयोजित केला आहे. महिला सक्षमीकरणासाठी मी आणि आमचा भाजपा पक्ष नेहमीच कार्यरत असते, अशी भावना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली.
नेरूळ येथे आ. मंदाताई म्हात्रे यांनी आयोजित केलेला जागतिक महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी माजी खासदार आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख विनय सहस्रबुद्धे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. देशात लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देत त्यांना राजकारणात आणि पर्यायाने समाजात सक्षम करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारने घेतला. महिलांसाठी हे असे धडाडीचे निर्णय फक्त भाजपच घेऊ शकते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन भाजपचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
कणखर आणि सक्षम महिला विधिमंडळात आल्यानंतर किती चांगली कामगिरी होते, हे मंदाताईंच्या कार्यपद्धतीतून सर्वांसमोर आहे. नवी मुंबईला हे पोलादी नेतृत्त्व लाभलं आहे, असंही ते म्हणाले. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईतील नेरूळच्या तेरणा विद्यालयाच्या पटांगणात जागतिक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बेलापूर मतदार संघातील महिला जमल्या होत्या. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या महिलांना पश्चिम बंगालमधून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं. भाजपने सातत्याने महिला सक्षमीकरणाची भूमिका घेतली जात आहे. नेरूळ येथील कार्यक्रमात महिला शक्तीला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या आयोजनाचं कौतुक केलं. मंदाताई नेहमीच आपल्या धडाकेबाज निर्णयशैलीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी मतदारसंघात केलेली कामं खरंच थक्क करणारी आहेत. महिलांमधील पोलादी नेतृत्त्व कसं असतं, याचं त्या उत्तम उदाहरण आहेत, असंही ते म्हणाले.
तसेच भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांचे बेलापूर विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या विकास कामांची प्रचिती पाहता ठाणे लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरूळ येथील माजी नगरसेविका सुनिता शेट्टी यांच्यासह तसेच सीबीडी येथील अमृता पवार, पुष्पा राठोड यांच्या सहअसंख्य महिलांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. तसेच वाशी येथील विकास सोरटे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नव्याने प्रकाशित केलेल्या ‘आपली नवी मुंबई टाईम्स’ या साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन ठाणे लोकसभा निवडणूक प्रमुख . विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सामाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. लखपती दिदी, ग्रामीण भागातील महिलांकरिता नमो ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना या सारख्या असंख्य योजना भाजपने महिलांसाठी राबवल्या. महिला सक्षमीकरणाची भूमिका भाजपने सातत्याने मांडली आहे. किंबहुना महिला सक्षमीकरणासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे, अशी भावना आ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माजी नगरसेविका सरस्वती पाटील, सौ. फुलन शिंदे, सौ. सुषमा दंडे, जयश्री चित्रे, सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे, उल्का तिकोणे, कविता जाधव, शारदा आमले, आरती राउळ, ज्योती पाटील, तेजस्वी म्हात्रे, शीतल जगदाळे, डॉ. वनिता राजे, सुधा राणी जैन, वनिता गडदे, उज्ज्वला बेल्हेकर, जयश्री विजयकुमार, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दिपक पवार, माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, समाजसेवक राजू तिकोने, विजय घाटे, समाजसेवक पांडुरंग आमले, सतीश निकम, विकास सोरटे, प्रताप भोसकर, दत्ता घंगाळे, देवा म्हात्रे, मकरंद म्हात्रे, चंद्रशेखर भोपी, प्रतिक पाटील, कुंदन म्हात्रे, सुजित कोळी, संजय ओबेरॉय, चिंतामण बेल्हेकर, चंदकांत कोळी, गंगेश कोळी, समाजसेवक राजेश पाटील तसेच असंख्य भाजपa कार्यकर्ते व हजारो महिला उपस्थित होते.