स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : डासांचा वाढता उद्रेक व त्याअनुषंगाने निर्माण होणारे साथीचे आजार संपुष्ठात आणण्यासाठी सानपाडा-जुईनगर नोडमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा गाव, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर तसेच जुईनगर नोड हा या परिसरात खासगी टॉवर, खासगी इमारती, सिडको वसाहती, चाळी, ग्रामस्थांच्या इमारती आदींचा परिसर आहे. सध्या सानपाडा गाव, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर तसेच जुईनगर नोड हा या परिसरात खासगी टॉवर, खासगी इमारती, सिडको वसाहती, चाळी, ग्रामस्थांच्या इमारती आदींचा परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. पावसाळ्यापासून सुरू झालेले मलेरिया, डेंग्यू, ताप आदी साथींचे आजार आजही कायम आहे. रहीवाशी खासगी दवाखाने व रुग्णालयात उपचार घेत असल्याने कदाचित पालिका प्रशासनाला या आजारांचे गांभीर्य निदर्शनास येत नसावे. साथीचे आजार हे प्रामुख्याने डासांमुळेच होत असतात. रहीवाशांना सांयकाळनंतर घराच्या दारे-खिडक्या बंद करून आत बसावे लागते, सोसायटी आवारातही फिरता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने केवळ रस्त्यावर धुरीकरण फवारणी न करता प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण केल्यास व सार्वजनिक उद्यान तसेच क्रिडांगणावर धुरीकरण केल्यास व हे धुरीकरण अभियान सातत्याने राबविल्यास डासांच्या त्रासासोबत साथीच्या आजारांचेही प्रमाण नियत्रंणात येईल. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना सानपाडा गाव, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर तसेच जुईनगर नोड हा या परिसरात खासगी टॉवर, खासगी इमारती, सिडको वसाहती, चाळी, ग्रामस्थांच्या इमारती आदी परिसरातील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.