नवी मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि भाजपाचे उमेदवार राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील लढत राज्यामध्ये हायव्होल्टेज लढत बनली आहे. शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत सातारा भागातील लोकांसाठी घरटी जनसंपर्क अभियान सुरु करत सातारकरांना गावाकडील लोकांना, नातेवाईकांना, मित्र परिवाराला शशिकांत शिंदेंना मतदान करण्यासाठी साकडे घातले जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार, यवा नेते व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सोळसकर, प्रभाग ८५चे शपगचे राष्ट्रवादी वॉर्ड अध्यक्ष यशवंत मोहीते (फौजी), सोमनाथ पवार, रोहन वाघ, प्रणव पवार यांनी रविवारी नेरूळ सेक्टर सहामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासाठी घरटी प्रचार अभियान रविवारी सुरू केले असून सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहामध्ये सातारा भागातील लोकांकडे घरोघरी जात आपल्या गावाकडील घरच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रांना ग्रामस्थांना शशिकांत शिंदेंना मतदान करण्यासाठी साकडे घालत आहे. नेरूळ सेक्टर ८, १०, २,४ तसेच नेरूळ पश्चिम, पूर्व, जुईनगर, सानपाडा, सिवूडससह मिळेल तिथे सातारा भागातील लोकांना संपर्क करणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सातारा भागातील लोकांना प्रत्यक्ष भेटून, व्हॉटसअपद्वारे संपर्क करून. मोबाईलवर कॉल करून महादेव पवार व त्यांचे सहकारी शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी पायपीट करत आहेत व मतदानासाठी साकडे घालत आहेत.
नवी मुंबईमध्ये नेरूळ, जुईनगर, सिवूडस, सानपाडा व सभोवतालच्या भागात सातारा भागातील लोकांची संख्या प्रचंड असून नवी मुंबईतून शशिकांत शिंदेंच्या विजयासाठी महादेव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोर्चेबांधणी करताना त्यांच्या प्रचार अभियान राबवित आहेत.