नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ९६-९७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आणि मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.भारतीय जनता पार्टी नेरूळ प्रभाग क्रमांक-९६/९७ आणि संदीप गणेश नाईक प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने नेरूळ सेक्टर १८ येथील हिंदूहॄदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये माजी आमदार व नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते उपस्थित ४०० ज्येष्ठ नागरिकांचा शाल व छत्री देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसाठी माजी नगरसेविका रुपाली किस्मत भगत, नवी मुंबई भाजपा चिटणीस गणेश भगत, समाजसेवक संजय पाथरे यांच्या वतीने चहा नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री व माजी नगरसेवक सूरज पाटील, ज्येष्ठ समाजसेवक किसन गायकवाड, समाजसेविका उल्का तिकोणे, विमल गांडाळ, समाजसेवक विष्णु वाडकर, संजय सकपाळ, भरत सकपाळ, रमेश नरवडे, बाळू गर्जे, दिलीप यादव, विकास तिकोणे, प्रभाकर सावंत, अशोक गांडाळ, सागर मोहिते, अक्षय शिरगावकर, सुभाष यादव, अरुण यादव, गणेश नागरगोजे, मयूर पवार, जयेश पवार, स्वयंम साबले, अक्षय विनेरकर, शुभम मोरे, गौरव सूर्यवंशी, रविंद्र भगत उपस्थित होते.