नवी मुंबई : नेरूळ पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरिक्षक ब्रम्हा नायकवडी यांची महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी नेरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हा नायकवडी यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासमवेत सचिव मंगेश गायकवाड, रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष रिक्षा चालक विवेक पवार, सचिव महेश भोसले, उपाध्यक्ष .लक्ष्मण साळुंखे, प्रमुख सल्लागार वामन रंगारी, प्रदीप मोहिते, कंत्राटी कामगार अध्यक्ष संजय सुतार, उपाध्यक्ष साहेबराव जाधव, राजू कदम, राजेंद्र जाधव, सुरेंद्र पगारे , सुशांत लंबे, गणेश शिंदे , विनोद मालुसरे व इतर उपस्थित होते.