श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : आमदार मंदाताई म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या नियोजनात सानपाड्यातील साई भक्तांची एकविरा सहल उत्साहात व जल्लोषात काढण्यात आली. या सहलीमध्ये आई एकवीरेच्या दर्शनासोबत, आमदार मंदाताई म्हात्रेंचा सहवास व नुसती धमाल अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया यात्रेत सहभागी झालेल्या साईभक्तांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या नियोजनाखाली काढण्यात आलेल्या सहलीसाठी सर्वप्रथम सानपाडा नोडमधील साईभक्तांची नोंदणी करण्यात आली होती. सहलीचे नियोजन अगदी काटेकोर पद्धतीने करण्यात आलेले होते. आरामदायी प्रवासी बसची उत्तम सोय होती. पांडुरंग आमले हे प्रत्येक नागरिक ,ज्येष्ठ महिला यांना उत्तम प्रकारे सांभाळून घेत होते. कुणी गाणी, अंताक्षरी खेळून, नाचून एकमेकांना चिडवून तर कुणी देवाचे अभंग, गवळणी सादर करून प्रवासाचा आनंद लुटला काहींनी गमतीशीर किस्से सांगून प्रवासाला रंगत आणली. देवदर्शनासाठी चढने असो किंवा उतरणे असो सर्वांची नियोजनाची साथ खूप मोलाची होती. कुणालाही न दुखावता प्रत्येकाची हजेरी व बसण्याची सोय अगदी छान पद्धतीने केली. नाश्ता, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या सोयीला, आमदार मंदाताईंच्या प्रशस्त फॉर्म हाऊसच्या आवारात असलेल्या नियोजनाची तर दाद द्यावीच लागणार असल्याचे सांगत साईभक्तांनी आमदार मंदाताई म्हात्रे, निलेश म्हात्रे व पांडुरंग आमले यांचे आभार मानले. या सहलीमध्ये सानपाडा नोडमधील ९८ साईभक्त सहभागी झाले होते. सहलीच्या सुरुवातीपासून ते प्रत्येक माणूस घरी जाईपर्यत आमदार मंदाताई म्हात्रे या पांडुरंग आमले यांच्याकडून खात्री करुन घेत होत्या. सर्वसामान्यांची काळजी घेणाऱ्या व सर्वांशी आपुलकीने, जिव्हाळ्याने संवाद साधणाऱ्या आमदार मंदाताई म्हात्रे या काही औरच असल्याची प्रशंसा आज सानपाडा नोडमध्ये सुरु झाली आहे.