अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : रविवारची सकाळ वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबईतील महिलांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. निमित्त होते आमदार मंदा म्हात्रे यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेने आयोजिलेल्या मंगळागौरीचा कार्यक्रमाचे. तरुणींपासून वयोवृद्ध महिलापर्यंत साऱ्यांनीच या देहभान विसरून कार्यक्रमात आपले पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई लोकल ट्रेन सेन्सेशन ब्रँड एम्बेसेडर पूजा रेखा शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली. यात कुणी साध्या गृहिणी होत्या, कुणी अभियंता, कुणी शिक्षक, कुणी प्राचार्या, कुणी बचतगट संचालिका, तर कुणी वेलनेस गुरू. यामुळे कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या महिलांसह उपस्थित महिला, प्रमुख पाहुण्यांनी आयोजक आमदार मंदा म्हात्रे यांचे कौतुक करून मंगळागौरीच्या खेळांचा आनंद लुटला. त्याच बरोबर सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र लावणी सम्राट नवी मुंबई भूषण व बालगंधर्व पुरस्कार विजेते अशिमिक कामठे यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाची सुरुवातच महिलांच्या मोठ्या समूहाने सामूहिकपणे केलेल्या दीपप्रज्वलनाने केली. हे दृश्य मोठे मनमोहक दिसले. यानंतर महिलांच्या एकेक गटाने आपले खेळ सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यात पारंपरिक वेशातील महिलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. आपले वय, आपण करीत असलेले काम, सारे विसरून सहभागी महिलांनी देहभान विसरून कार्यक्रमाचा आनंद लुटला. या प्रसंगी महिला व्यासपीठावर मंगळागौरीचे खेळ, गाणी सादर करीत असताना सभागृहात उपस्थित महिलांनी नाचगाण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्यांच्या आग्रहास्तव आमदार मंदा म्हात्रे यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. कार्यक्रमात विविध खेळ खेळण्याचा अनादिकाळापासून चालत आलेला प्रघात दिसून आला. यामध्ये संघात दिसून महिला मंगळागौरीची पारंपरिक नृत्ये, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद आनंद लुटताना दिसल्या. यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अठुडं केलं गठुडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ महिला खेळल्या. मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, पारंपरिक गायन व विविध प्रकारच्या कला दाखविणाऱ्या प्रथम परितोषिक ५००१ रुपये साई भक्त महिला मंडळ (सानपाडा), द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये नूतन महिला मंडळ (सीबीडी)दुसरे, तर तृतीय पारितोषिक रू. २००१ रुपये स्वामिनी महिला मंडळ (वाशी) व उत्तेजनार्थ पारितोषिक रू. १००१, म्हणून गोरबंद राजस्थानी मंडळ (वाशी) यांना देऊन गौरविण्यात आले. याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून नशीबवान महिला विजेत्या नंदा पवार (नेरुळ पच्छिम), दर्शना गावडे (सीवूडस), हिराबाई चव्हाण (वाशी), वैशाली सकपाळ (सीवूडस) यांना सुबकदार नथ तसेच सुनीता शिंदे (सानपाडा), देवयानी मुकादम (सीबीडी), ममता गोस्वामी (वाशी), रेणुका बागुल (सीवूडस), कांतिदेवी चौधरी (सीबीडी), स्नेहल राहटे (सीबीडी), जयश्री शेवते (सानपाडा), यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. उपस्थित सर्व महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटून मंदा म्हात्रे यांच्या संयोजनाचे कौतुक केले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी महापौर सुषमा दंडे, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, माजी नगरसेविका सरस्वती पाटील, माजी नगरसेवक दिपक पवार, समाजसेवक पांडुरंग आमले, यु एंड मी इंटरटेंटमेंटच्या संस्थापक गरिमा शर्मा, मिस इंडिया अर्थ किरण राजपूत, नेहा, अॅड. मेघा धुमाळ, प्राणा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. प्राची पाटील, समाजसेविका उषा दत्त, भावना ग्रुप, उल्का तिकोने, शारदा आमले, सुवर्णा चिकने, आश्विनी घंगाले, ज्योती पाटील, सुहासिनी नायडू, देविका करपे, जयश्री चित्रे, प्रमिला खडसे, मालती सोनी, एंड्रो मॉरिस, पोलीस नाईक राजश्री कदम, आरती राऊळ, चैताली ठाकूर, शितल जगदाळे तसेच असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.