स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपाच्या बेलापुर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी शनिवार, दि. १० ऑगस्ट रोजी वाशीमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
वाशीतील सेक्टर ९ मधील भाजपा कार्यालयात हे महाआरोग्य शिबीर होणार असून लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉ. प्रताप मुदलीयार, मयुरेश हॉस्पिटल तुर्भे व एसएलव्हिसी क्लिनिक (रक्तवाहिन्यांचा विशेषज्ञ) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, बीएमडी, ईसीजी, डोळ्याची तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषधे, मोफत चष्मा, मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे.
या महाआरोग्य शिबिरामध्ये नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी संयुक्तपणे केले आहे.