अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर १४ येथील मल:निस्सारण केंद्राच्या शेजारी असणारा घनकचरा पार्किंग ग्राऊंडवर सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन समारंभ होणार आहे
महाराष्ट्र कर्मचारी युनियन आपल्या नवीमुंबई महानगरपालिकेत अधिकारी व सर्व कामगार यांना एकत्रित करून गेली नऊ वर्ष सातत्याने ठोक मानधन व कंत्राटी कामगारांच्या हिताच्या संदर्भात आपले म्हणणे व कामगारांचे प्रश्न सातत्याने प्रशासनापुढे व अधिकाऱ्यांसमवेत मांडत आलेली आहे व लेखी निवेदनातून तसेच शिष्टमंडळासमवेत महापालिका ते मंत्रालयदरबारी सातत्याने पाठपुरावाही करत आहे. तसेच अनेक प्रश्न या युनियनच्या माध्यमातून प्रशासनदरबारी सोडवण्यात आलेले आहेत व अनेक कामगारांना, अधिकाऱ्यांना न्यायही युनिनयनने मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही कामगार संघटना नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठी संघटना असून या संघटनेकडे सभासद संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा या संघटनेने सतत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात महापालिकेतील कामगार येऊन सभासद होताना दिसत आहेत. कामगारांचे हित हेच संघटनेचे धोरण या उक्तीप्रमाणे कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घनकचरा व्यवस्थापन व कचरा वाहतूकचे सुपरवायझर आणि कामगार या युनियनचे सदस्य झालेले आहे.
तरीही या कार्यक्रमाला संबंधित विविध विभागातील पालिका कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन कचरा वाहतूक चे संघटनेचे युनिट सभासद / पदाधिकारी तसेच मलनिःसारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, परिवहन विभाग, आरोग्य विभागातील सर्व आस्थापणेतील संघटनेचे कर्मचारी सभासद/पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.