सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंवई : महापालिका परिवहन विभागातील ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या वाहक व चालक कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे.
परिवहन व्यवस्थापक उपस्थित नसल्याने त्यांनी परिवहनचे कॅफो तुषार दौंडकर आणि गणेश आचलकर यांची शिष्टमंडळासमवेत कामगार नेते रविंद्र सावंत भेट दिली घेत, त्यांनी या भेटीत
१) नवी मुंबई महापालिकेतील परिवहन विभागामध्ये काम करणारे सर्व वाहक, चालक, रोजंदारी तसेच ठोक मानधनावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये सामावून घेणेबाबत तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन लागू’ करण्यात यावे. २) वाढत्या महागाईप्रमाणे वाहक, चालक यांच्या वेतनात वाढ करण्यात यावी तसेच रोजंदारीतही वाढ करण्यात यावी. ३) वाहक व चालक यांचा अपघात झाल्यास अथवा आजारपण आल्यास त्यांना कर्ज काढून उपचार करावा लागतो. त्यासाठी आपण या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावी. ४) २०१९ पासून सर्व वाहक, चालक तसेच रोजंदारीवरील व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात आलेला नाही व तो गणवेश त्वरित देण्यात यावा. ५) रोजंदारी व ठोक मानधनावरील कर्मचारी हा जर आजारी पडल्यास अथवा त्याचा अपघात झाल्यास उपचार घरी बसूनच घेत असल्यास त्याचा पगार प्रशासनाने द्यावा. ६) ठोक मानधनावरील कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी जे दहा ते बारा वर्ष परिवहन विभागामध्ये काम करत आहेत. ते अपघातामुळे अथवा आजारपणामुळे दगावल्यास त्याच्या कुटुंबातील मुख्य सदस्याला नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. ७) परिवहन विभागातील कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील २०१५ पासून राहिलेला थकीत एरियस देण्यात यावा. ८) चालक व वाहकास ट्रेनिंगला काढल्यास पर डे २०० रुपये जमा करून ट्रेनिंग दिली जाते. ती पद्धती तात्काळ बंद करण्यात यावी व तो दिवस भरून संबंधित कर्मचाऱ्यांना मोबदला देण्यात यावा. ९) परिवहन विभागामध्ये काम करणारे सर्व वाहक, चालक, रोजंदारी तसेच ठोक मानधनावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सर्व सार्वजनिक सुट्ट्या व वैद्यकीय रजा देण्यात याव्यात, या मागण्या कामगार नेते रविंद्र सावंत यांनी परिवहन व्यवस्थापकांकडे केल्या आहेत.
कर्मचारी असुविधेमध्ये तसेच समस्यांमध्ये असतानाही तो प्रामाणिकपणे काम करत आहे, कामावर त्याचा कोणताही परिणाम ते होऊ देत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवून, त्यांना सुविधा उपलब्ध करुन देताना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.