स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिवूडस विभागातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे विभागातील नागरिकांचा उद्रेक होण्याच्या आत या चोऱ्यांचा छडा लावावा तसेच चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक रहीवाशांच्या शिष्टमंडळाने भेट घेत साकडे घातले आहे.
सिवूडस विभागातील जागरूक आणि सुजाण नागरिकांसोबत एन आर आय सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासोबत शनिवारी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. यामध्ये विशेषतः गेल्या काही कालखंडापासून सीवुडस विभागात दुकाने फोडणे, कारच्या बॅटरी काढून नेणे, दुचाकी चोरीला जाणे, घरामध्ये दरोडा टाकणे अशा घटना घडत आहेत. याशिवाय विभागात वेगवेगळ्या पद्धतीने नशा करणे या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही कालखंडापासून हे प्रकार जास्त वाढल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे.परिसरातील सुखसागर आणि स्नेहमिलन सोसायटीत झालेल्या दरोड्यातील चोरांना लवकरात अटक करावी तसेच या चोरांना माहिती देणाऱ्या घटकांवरही सक्त कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक परिसरातील माजी युवा नगरसेवक विशाल डोळस यांच्यासह शिष्टमंडळात सहभागी झालेल्या स्थानिक रहीवाशांनी केली आहे. शिष्टमंडळात तानाजी कवडे, संजय गंगावणे, संजय सोमदे, अल्का वणवे, तबसूम शेख, श्रीकांत पवार, महेंद्र शिंदे, आनंद कुंभार, अनिकेत वणवे, विनया जाधव, आरती वाघमारे, रुपाली परमाणे, श्रेया धारवडकर, हर्षा पाटील, सुरेखा दिवारे, हाजरा शेख, सायला बानू, सचिन हाडवळे, आनंद जाधव, सतीश धावडे, समीर म्हसाळकर, विवेक चव्हाण इत्यादी सहभागी झाले होते.