स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बदलापूर येथील आदर्श शाळेतील ३ वर्षाच्या मुलीवर त्याच शाळेतील कर्मचारी याने लैंगिक अत्याचार केला. त्याचा निषेध म्हणुन महारष्ट्र नवनिर्माण महिला सेना, नवी मुंबईकडून गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
‘फाशी द्या, फाशी द्या’,‘नराधमाला फाशी द्या’, ‘पास करा,पास करा, शक्ती कायदा पास करा’, ‘चौरंग करा, चौरंग करा’, ‘नराधमाचा चौरंग करा’, ‘परवानगी द्या,परवानगी द्या’, ‘महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या’, अशा घोषणा देवून मनसे कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी अनेक महिलांनी सरकार वरती आणि नराधमावर राग व्यक्त करून अत्यंत कठोर शिक्षेची मागणी केली.
या निषेध आंदोलनात मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहरअध्यक्ष अनिता नायडू, दीपाली ढवूल, मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, महिला सेना शहर सचिव यशोदा खेडस्कर, सायली कांबळे, मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, महिला सेना शहर सहसचिव अॅड. रंजिता चौहान, ललिता शर्मा, वंदना घार्गे, मनसे शहर सह सचिव अभिजित देसाई, अनुष्का देसाई, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर संघटक सनप्रीत तूर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, महिला सेना विभाग अध्यक्ष विद्या इनामदार, नंदा मोरे, शीतल दळवी, सुनीता महाजन, प्रियांका शिरोडकर, प्रिया शिंदे, मनसे विभाग अध्यक्ष सागर विचारे, अमोल आयवळे, भूषण कोळी, उमेश गायकवाड, श्याम ढमाले, चंद्रकांत मंजुळकर, विजय घरत, योगेश शेटे, निखिल गावडे, अनिकेत भोपी व इतर मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.